
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.
आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.
आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...
पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.
कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !
सुविचार - १ ते २८
- १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
- २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
- ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
- ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
- ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
- ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
- ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
- ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
- ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
- १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
- ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
- १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
- १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
- १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
- १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
- १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
- १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
- १८) आधी विचार करा; मग कृती करा.
- १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
- २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
- २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
- २२) अतिथी देवो भव ॥
- २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
- २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
- २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
- २५ अ) तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे.
- २५ ब) स्त्रिया या प्रथमतः स्त्रियाच असून, त्या ज्याक्षणी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व धारण करतील, त्याक्षणी हे जग सर्वार्थानं वेगळं अधिक सुंदर, अधिक आनंदमय होईल
- २५ क) एखाद्यास शिष्टाचाराने हरविणे म्हणजे सर्वात मोठा विजय प्राप्त करणे.
No comments:
Post a Comment