!! आजचे सुभाषित !!

!! आजचे सुभाषित !!
फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

Saturday, October 2, 2010

राजा शिव छत्रपती


राजा शिव छत्रपती या मालिकेचे शीर्षक गीत


Saturday, August 21, 2010

आदरणीय कै. नारायण सुर्वे सरांना भावपूर्ण आदरांजली.



मराठी कविता गोडगुलाबी आणि गौडबंगाली बाजात अडकली असताना रोजच्या जगण्यातील जीतेजागते संघर्षमय वास्तव साध्या आणि थेट शब्दांत मांडणारे ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांचे प्रदीर्घ आजाराने सोमवारी येथील ' ठाणे हेल्थ केअर ' मध्ये निधन झाले . ते ८४ वर्षांचे होते . कामगार , कष्टकरी , वंचित या वर्गांच्या व्यथा - वेदनांना धारदार शब्दरूप देणाऱ्या आणि त्याद्वारे निरर्थक शब्दांच्या वेढ्यातून कविता मुक्त करणाऱ्या या थोर कवीच्या जाण्याने कवितेचे ' ब्रह्म ' लोपल्याची शोकसंवेदना व्यक्त होत आहे . सोमवारी संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत असंख्य चाहत्यांच्या उपस्थितीत , सरकारी इतमामात सुर्वे यांना अखेरचा निरोप देण्यात आला .

गिरणगावातल्या कामगाराच्या वेदनेला शब्दांची धार देणारे ज्येष्ठ कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे आज ठाणे येथील हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते श्वसनविकार आणि दम्याच्या त्रासाने आजारी होते.

सोमवारी दुपारी त्यांचे पार्थिव प्रभादेवीतील लोकवाङ्मय गृह येथे अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कण्यात आले.

लालबाग-परळमधील गिरणीकामगाराची वेदना सोबत घेऊन जन्मलेल्या सुर्वे यांनी आयुष्याची विविध रंग अनुभवले. रस्त्यावरल्या जगण्याचे चटके सोसताना त्यांनी कामगार चळवळीची दाहकताही अनुभवली. गिरणगावातील डाव्या चळवळीत त्यांनी समाजकारणाचे धडे घेतले. आपले ते रस्त्यावरचे आयुष्य हे ' माझे विद्यापीठ ' च आहे असे त्यांनी मानले आणि ते शब्दातही मांडले।

कामगार आहे मी तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे

नारायण सुर्वे यांचा पहिला काव्यसंग्रह ' ऐसा गा मी ब्रह्म! ' १९६२ मध्ये प्रकाशित झालं. त्या सुमारास ते मौज , सत्यकथा , मराठा , मांडवी , वीणा , युगांतर , भारूढ अशा काही नियतकालिकांतून कविता लिहित होते. त्यानंतरच्या चार वर्षांनी त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आला. ' माझें विद्यापीठ '

कामगार जीवनाशी असलेल्या थेट संबंध असल्यामुळे कवी मनाचे नारायण सुर्वे यांनी त्यांनी शाळेत शिक्षक म्हणून शिकवत असतानाच कामगार चळवळीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. १९७० च्या दशकात भारत , तत्कालीन सोवियत रशिया आणि पूर्वेकडील देशांमध्ये सक्रीय कामगार नेते म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली. मुंबईतील कामगार संघटनेत काम करताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी तीव्र संघर्ष केला. पण या काळातही कवितेशी असणारी मैत्री काही तोडली नाही.

कवितेतून भीषण वास्तव मांडणा-या नारायण सुर्वे यांना १९९८मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना सुवर्ण कमळ आणि १९९९च्या कबीर पुरस्काराने गौरविण्यात आले. परभणी येथे १९९५ मध्ये संपन्न झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. साहित्य अकादमीवर मराठी साहित्य या विषयासाठी नेमलेल्या सल्लागार समितीवर समन्वयक म्हणून त्यांनी काम पाहिले होते.


तमाम महाराष्ट्र वासियांकडून आदरणीय कै. नारायण सुर्वे सरांना भावपूर्ण आदरांजली.

सौजन्य

Friday, June 4, 2010

कधीच वाटलं नव्हतं!


तुझ्यासारखं असं लावण्य मी
अगोदर कधीच पाहिलं नव्हतं
त्याच प्रमाणे तुझ्याविना मला
एकटंच जगावं लागणार
असं कधीच वाटलं नव्हतं!
मी अनेक प्रकारच दु:ख सोसलं होतं
पण, आज
मी नवा अनुभव घेऊन
मी तुझ्या विरहाचं
दु:ख भोगलं होतं
पण, तुझ्या प्रेमात मी हेच विसरलो
कि, तुझ्या त्या एका नकाराने
माझं हृदय कधीच मोडलं होतं
त्या दिवशी तू दिलेल्या
त्या नकारार्थी उत्तराने
तर प्रथम मला धक्काच बसला
कारण, तुझा विरह मला
जीवनभर सोसावा लागणार
या विचारानेच
माझं जीवन, माझं अस्तित्व
सुर्यास्ताप्रमाणे मालवलं होतं!
म्हणूनच मी
बर्याचदा माझ्या
हृदयाला टोकलं होतं
प्रेम करू नकोस!
प्रेम करू नकोस!
प्रेमात एकटं पडायला होतं
पण त्याने माझं काहीचं ऐकलं नव्हतं
का तर त्याने यापूर्वीच
आपलं सर्वस्व
तुझ्या चरणी वाहिलं होतं!
- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असं एकटा! - काव्यसंग्रह)

Monday, May 31, 2010

तुला कसा विसरू?


जीवनात अशा काही
व्यक्ती येतात आणि
अशी नाती बनवून जातात कि
ती नाती विसरता येत नाहीत
आपलं नातं हि याचपैकी
एक आहे - प्रेमाचं
मग मी तुला कसा विसरू शकतो!
तुझ्या आठवणी
हळुवार पावलांनी माझ्या
हृदयाचे दरवाजे ठोकवतात
माझ्या डोळ्यांच्या पापण्यांवर
तुझीच स्वप्न राज्य करतात
मग, मी तुला कसा विसरू शकतो!
माझ्या ओठांवर सदैव
तुझ्याच गोष्टी असतात
डोळ्यात तुझीच स्वप्न
हृदयात तुझीच मूर्ती
मग, मी तुला कसा विसरू शकतो!
तुझ्याविना जगणं, हा
विचारच मला सोसवत नाही
कारण, माझं अस्तित्व, माझं जीवन
माझं आयुष्य, माझं सर्वस्व
तुझ्यावरच अवलंबून आहे
मग, मी तुला कसा विसरू शकतो!
मित्रांसकट तुही म्हणालीस
"मला विसर" म्हणून
पण तुला कसा विसरू हेच
मला कोणी संगत नाही
मग, मी तुला कसा विसरू शकतो!
तुझा विरह सोसनं म्हणजे
माझ्यासाठी तर ती
जीवघेणी शिक्षा आहे, तरीही
तुझा विरह सोसेन मी
पण, पुन्हा बोलू नकोस
मला विसर म्हणून
कारण मी तुला विसरू शकत नाही!
तुला विसरणं माझ्यासाठी फारच कठीण आहे
कारण माझं पाहिलं प्रेम
तूच आहेस आणि
पाहिलं प्रेम विसरणं इतकं
सोपं असतं का?
नाही ना...... मग
तूच संग मला आता
मी तुला कसा विसरू शकतो!
- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असं एकटा! - काव्यसंग्रह)

Friday, May 28, 2010

प्रेमाचा रंग !


प्रेम तुझा रंग कसा?
हृदयातूनी उमलला जसा
रंग तुझे आहेत वेगळे
रूप तुझे आहे निराळे
जगावेगळा आभास तुझा
तुझ्याविना जीवन आहे सजा
प्रेम तुझा रंग कसा?
चेहर्यावर चंद्रकला उमलते
ओठांवरती हास्य उमटते
इंद्रधनुचे सप्तरंग पाहुनी
बागेत मोगरा फुलाला जसा
प्रेम तुझा रंग कसा?
नयनांचा हा खेळ निराळा
शब्दांनाही नसतो आळा
घाव करितो हृदयावरती
मनामधला भाव जसा
प्रेम तुझा रंग कसा?
वात्सल्याचा आपुलकीचा
नाजूक रेशीम धागा जसा
दोन शरीरात विश्वासाचा
एकच आत्मा वसला जसा
प्रेम तुझा रंग कसा?
- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असं एकटा! - काव्यसंग्रह)

आठवण


प्रिये...
जेव्हा जेव्हा तू श्वास घेशील
बोलण्याशी तोंड उघडशील
तेव्हा तुला माझीच आठवण येईल
समुद्राच्या उसळणार्या लाटा पाहून
गुलाबाचं रक्षण करणारा काटा पाहून
बघ तुला माझीच आठवण येईल
पावसाच्या धारा जेव्हा
उन्हाळ्यानंतर धरतीवर पडतात
तेव्हाचा तो सुकलेल्या
मातीचा वास अनुभव आणि
बघ तुला माझीच आठवण येईल
सूर्य जेव्हा उगवतो
सूर्य जेव्हा मावळतो
तेव्हा सूर्याच आपल्या
कार्यकुशलतेवरच प्रेम पाहून
बघ तुला माझीच आठवण येईल
जेव्हा एखादी मधमाशी
थेंबाएवढ्या मधासाठी
वेगवेगळ्या फुलांवर भिरभिरते
मध जमा करते तेव्हा
त्या माशीच मधासाठी आतुरणं पाहून
बघ तुला माझीच आठवण येईल
तू असं कर नाहीतर तू तसं कर,
तू हे बघ नाहीतर तू ते बघ,
तू इथे जा नाहीतर तू तिथे जा
तुला तुझ्या प्रत्येक
पाऊला पाउलांवर
बघ तुला माझीच आठवण येईल
-रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा!- काव्यसंग्रह)

Thursday, May 27, 2010

स्वा. विनायक दामोदर सावरकर

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्य जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकर हे गावातील प्रतिष्ठित गृहस्थ होते. विनायकराव हे त्यांचे दुसरे चिरंजीव. थोरले बाबाराव आणि धाकटे नारायणराव. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी ह्यांनी त्यांच्यावर आईसारखीच माया केली. सावरकरांचे वडील १८९९ च्या प्लेगास बळी गेले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चापेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.

मार्च, १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर १९०२ साली फर्गसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.

राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना त्यांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते.

श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी घोषित केलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती.

१८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते स्वातंत्र्यानंतर प्रसिद्ध झाले.

राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्यापाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती.

वीर सावरकरांनीच पुढे दुसर्‍या महायुद्धाच्यावेळी जपान येथे जाउन नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी "आझाद हिंद फ़ौजेचे" सेनापतिपद भूषवावे अशी गळ घातली. त्यासाठी त्यांनी श्री रासबिहारी बोस यांचे पत्र नेताजींना दाखवुन सेनापतीची गरज पटवून दिली.पुढचा रोमहर्षक इतिहास सगळ्यांना माहीतच असेल.पण मुख्य प्रेरणा वीर सावरकरांचीच होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिट

ग्रंथ आणि पुस्तके

वीर सावरकरांनी ,००० च्या हुन जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. क्वचितच कोणी इतर मराठी लेखकाने इतका अमुल्य ठेवा मराठी भाषेला दिला असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.

इतिहास

  • १८५७ चे स्वातंत्र्यसमर (इ.स. १८५७ च्या युद्धाचा स्वातंत्र्यसमर असा उल्लेख करून तो लढा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास, पहिल्यांदा त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून जोडला)
  • भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  • हिंदुपदपादशाही

कथा

  • सावरकरांच्या गोष्टी भाग - १
  • सावरकरांच्या गोष्टी भाग - २

कादंबरी

  • काळेपाणी
  • मला काय त्याचे

आत्मचरित्रपर

  • माझी जन्मठेप
  • शत्रूच्या शिबिरात
  • अथांग( आत्मचरित्र पूर्वपीठिका)

लेखसंग्रह

  • मॅझिनीच्या आत्मचरित्राची प्रस्तावना - अनुवादित
  • गांधी गोंधळ
  • लंडनची बातमीपत्रे
  • गरमागरम चिवडा
  • तेजस्वी तारे
  • जात्युच्छेदक निबंध
  • विज्ञाननिष्ठ निबंध
  • स्फुट लेख
  • सावरकरांची राजकीय भाषणे
  • सावरकरांची सामाजिक भाषणे

नाटके

  • संगीत उ:शाप
  • संगीत संन्यस्त खड्‌ग
  • संगीत उत्तरक्रिया
  • बोधीसत्व- (अपूर्ण)

कविता

महाकाव्ये

  • कमला
  • गोमांतक
  • विरहोच्छास
  • सप्तर्षी

स्फुट काव्य

  • सावरकरांच्या कविता

तो आणि ती!


प्रेमाची व्याख्या
प्रेमाची भाषा
प्रेमाचा विश्वास तर
प्रेमाचा आत्मा म्हणजे
तो आणि ती!
त्यातला तो म्हणजे पूर्व
तर ती म्हणजे पश्चिम
दोघेही भिन्न स्वभावाचे
तरीही एकमेकांवर
जिवापाड प्रेम करणारे
तो आणि ती!
प्रेमाची साथ
जीवनाची गाठ
फिरवत नाही कधी
एकमेकांपासून पाठ
कारण दोघांची
एकाच पाउलवाट
तो आणि ती!
त्या दोघातली ती
रुसलीच कधी त्याच्यावर
तर तो देऊन गुलाब
समजूत काढतो तिची, असे
तो आणि ती!
दोघेही सापडलीच कधी
अडचणीत तर
सखी बनून त्याची
ती साथ देते त्याला
आणि सखा बनून तिचा
तो साथ देतो तिला, असे
तो आणि ती!
दोघांची या असली
भिन्न शरीरे जरी
तरी वसला आहे त्यांच्यात
एकचं आत्मा त्यांच्या प्रेमाचा
असे आहेत दोन जीव
एकमेकांवर जीवापाड
प्रेम करणारे....
तो आणि ती!
-रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा!- काव्यसंग्रह)

Monday, May 24, 2010

सुविचार 1

सुविचार - २६ ते २८

मराठी सुविचार पुढील भाग -
  • २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.
  • २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.
  • २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.
  • २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
  • ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
  • ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.
  • ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.
  • ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
  • ३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
  • ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
  • ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
  • ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
  • ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची
  • ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
  • ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !!
  • ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.
  • ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
  • ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.
  • ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी
  • ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.
  • ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा
  • ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.
  • ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.
  • ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
  • ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते।
क्रमश:

Friday, May 21, 2010

सुविचार!


सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.

आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...

पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !

सुविचार - १ ते २८

  • १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
  • २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
  • ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
  • ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
  • ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
  • ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
  • ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
  • ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
  • ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
  • १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
  • ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
  • १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
  • १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.
  • १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.
  • १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
  • १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
  • १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
  • १८) आधी विचार करा; मग कृती करा.
  • १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,
  • २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
  • २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.
  • २२) अतिथी देवो भव ॥
  • २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
  • २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.
  • २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.
  • २५ अ) तुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे.
  • २५ ब) स्त्रिया या प्रथमतः स्त्रियाच असून, त्या ज्याक्षणी स्वतंत्र व्यक्तिमत्त्व धारण करतील, त्याक्षणी हे जग सर्वार्थानं वेगळं अधिक सुंदर, अधिक आनंदमय होईल
  • २५ क) एखाद्यास शिष्टाचाराने हरविणे म्हणजे सर्वात मोठा विजय प्राप्त करणे.
क्रमश:

होळी (पालखी) उत्सव




आमच्या गावी मुक्काम कुरंग, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी येथे साजरा झालेला होळी (पालखी) उत्सव त्या क्षणाच्या काही आठवणी या विडीयोतून.
- रवि विश्वासराव (कवी)
(आठवणींच्या खजिन्यातून)

Tuesday, May 18, 2010

तुला पहिले मी....


डोळ्यांतून दाखवताना
मनात सारे लपविलेले
ऐकविताना शब्द मजला
ओठांवर न आलेले
तुला पहिले मी....
पाहताच मला कोठे
बिथरून तुझे जाणे
नजर चुकविता मजपासुनी
पाय तुझे थरथरलेले
तुला पहिले मी....
जगावेगळी अदा तुझी
होकार असूनही नकार देसी
फसवुनी उभ्या जगाला
कोडे प्रेमाचे घातलेले
तुला पहिले मी....
शब्द माझे बहरून येती
तुझ्याच सप्त सुरांतुनी
रुसवा फुगवा धरून मनी
गीत माझे गायलेले
तुला पहिले मी....
सुखात माझ्या हसणे अन
दु:खात अश्रू ढाळताना
धरून उगाच मनी अबोला
नाजूक बहाणा करताना
तुला पहिले मी....
चुकताना पाऊल माझे
तूच आलीस सावरायला
लपवूनी ते अपराध माझे
जगसामावेत भांडताना
तुला पहिले मी....

- रवी विश्वासराव (कवी)
(स्वप्नांच्या वाटेवरती - काव्यसंग्रह)

Monday, May 17, 2010

तुळजापूरची तुळजाभवानी....


महाराष्ट्राची शक्तीदायिनी अशी जिची ख्याती ती आदिशक्ती तुळजाभवानी! शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान! अशा या तुळजाभवानीचे ठिकाण असलेले तुळजापूर म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रासाठी पुजनीय. तुळजापूर हे गाव उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. तुळजाभवानीचे मंदिर बालाघाट डोंगराच्या एका पठारावर बांधण्यात आले आहे. तुळजा या शब्दाचा मूळ अर्थ 'तात्काळ मदतीला येणारी' असा सांगतात. तुळजा हे त्वरजा या शब्दाचा अपभ्रंश आहे, असेही सांगितले आहे.

या देवीच्या उत्पत्तीमागे अशी कथा सांगितली जाते की, कृतयुगामध्ये या भागात कर्दम ऋषींचा आश्रम होता. त्यांची पत्नी होती अनुभूती. कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर अनुभूतीला सहगमन करायचे होते. पण ती त्यावेळी गर्भवती असल्याने तिला तसे करता आले नाही. म्हणून तिने मुलगा मोठा होऊन गुरुगृही गेल्यानंतर देवीच्या तपश्चर्येला प्रारंभ केला. या तपश्चर्येच्या काळात कुकूर नावाच्या राक्षसाची नजर अनुभूतीवर पडली. त्या राक्षसापासून स्वत:ला वाचविण्यासाठी तिने देवीची प्रार्थना केली आणि अष्टभूजेच्या रुपात देवीने प्रगट होऊन तिचे रक्षण केले. तिथेच देवीने वास्तव्य केले. हेच ठिकाण तुळजापूर नावाने पुढे प्रसिध्द झाले.

या मंदिरात जाण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये ९० पायर्‍या चढाव्या लागतात. काही पायर्‍या चढून गेले की इथे एक कल्लोळ तीर्थ नावाचं कुंड दिसतं. सर्व तीर्थांना इथे प्रगट व्हायचे होते आणि त्यांनी एकच कल्लोळ केला, असं म्हणतात. म्हणून या तीर्थाचे नाव कल्लोळ तीर्थ पडले आहे. त्यानंतर भेटतं ते गोमुख तीर्थ. याशिवाय इथे गणेश तीर्थ, अमृतकुंड हे कुंडही आहेत. याशिवाय मंदिराकडे जाताना विठ्ठल, दत्तात्रय, सिध्दीविनायक यांची मंदिरे लागतात.

मुख्य मंदिराभोवती मोठे प्रांगण आहे आणि आजुबाजूला प्रशस्त ओवर्‍या आहेत. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत. त्यांचे बांधकाम शिवाजी महाराजांनी केले आहे, असे म्हणतात. देवीच्या मंदिरासमोर भवानीशंकराचे मंदिर आहे. या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह हे देवीचे वाहन आहे. तुळजाभवानीची मूर्ती ही अष्टभूजा असून तिने बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी धारण केली आहे. पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे. युध्दाच्या तयारीत असलेल्या या अष्टभूजेचे हे रौद्र रुप तरीही विलोभणीय आहे.

या मंदिरात देवीची चार वेळा पूजा केली जाते. याशिवाय देवीचे नवरात्र हा सर्वात मोठा उत्सव असतो. याशिवाय गुढीपाडवा, ललितापंचमी, बलिप्रतिपदा, मकरसंक्रांत, शिलाष्टमी आणि रथसप्तमी या दिवशी देवीची महापूजा असते.

या देवीने रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असे म्हणतात. रामाला दिशादर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी ही तुळजाभवानी आहे. म्हणूनच ती महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.

जय जय अष्टभूजा नारायणी हो !
दुर्गा, भवानी, तुळजा, तुझी तुळजापुरी देखीली हो!
असे म्हणताना त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचे मस्तक नमते आणि बाहू स्फुरतात ते यामुळेच!

मी आणि माझी कविता!


अंतकरणातून तुलाच
सर्वस्वी आपलं मानून
तुझ्याच स्वप्नात रंगून
नेहमी तुझ्या आठवणीने
तळमळत असतो
मी आणि माझी कविता!
माझं काव्य फक्त
तुझ्याचसाठी आहे
त्यात आपल्या प्रीतीचे
मधुर स्वर आणि भावना
एकवटल्या आहेत, म्हणूनच
तुझ्या विरह क्षणात तुला
काव्यातूनच अनुभवत असतो
मी आणि माझी कविता!
तुझ्यावर काव्य करण्यासाठी
सदैव शब्द कमी पडतात
कुठे अडखळलोच जर मी
तर काव्य पूर्ण करण्यासाठी
सदैव एकमेकाला मदत करतो
मी आणि माझी कविता!
तुझ्या विरहाचा गुंता सोडवून
तुझा विरह दूर करण्यासाठी
एकमेकांच्या सोबतीने आम्ही
सदैव प्रयत्न करत असतो
मी आणि माझी कविता!
तू नसलीस कि मला
सोबत होते शब्दांची
आणि एकतर्फी प्रेमात
निर्माण झालेल्या काव्याला
सोबत होते माझी,
का तर....
तुझ्याविना काहीच
अस्तित्व नसल्याप्रमाणे आहोत
मी आणि माझी कविता!

- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

प्रेम का होतं?


मन हे वेडं असतं
एखादी व्यक्ती आवडली
कि तिच्यावर प्रेम करून बसतं
पण.... मला हे कळत नाही
प्रेम का होतं?
डोळ्यांतून नेहमी
अश्रू वाहण्यासाठी कि,
हृदयाला सतत
वेदना देण्यासाठी
प्रेम का होतं?
त्या व्यक्तीच्या विरहाने
जीवनाचं रान होण्यासाठी कि,
त्याच व्यक्तीच्या सहवासाने
जीवनात पालवी फुलवण्यासाठी
प्रेम का होतं?
जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत
तिच्या आठवणीने
प्रेमपथावर एकटं चालण्यासाठी कि,
तिच्या सोबतीने नवीन
आयुष्याच्या सूर्योदयाबरोबर
जीवनाची पहाट सजवण्यासाठी
प्रेम का होतं?
कोणी म्हणतं
प्रेम हि जीवनातील
कठोर परीक्षा आहे आणि
त्या परीक्षेत सर्वच
उत्तीर्ण होत नाहीत
मग मला हे कळत नाही
प्रेम का होतं?

- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

Friday, May 7, 2010

माझी सखी



आहे माझी एक सखी
निरागस साधी भोळी,
रूपापेक्षा मनाने सुंदर असून
सर्वांची भरते सुखाने झोळी
माझ्यासारखं तिलाही
कविता करायला फार आवडतं
यमक जुळवता जुळवता
तिला आठवणींच्या गावात पाठवतं
काही नाही तर तिला म्हणे
भांडायला फार आवडतं
भांडताना ती म्हणते
तोंड तीच काहीही बडबडत
तिला रडण माहीतच नाही
कारण ती नेहमी हसतच असते
रागवलं
जरी कोणी तिच्यावर
हसून ती राग शांत करते
तिला हासण्याच कारण विचारलं
कि ती म्हणते
हसण्याने आयुष्य वाढतं
आणि आपल्याला हसताना पाहून
समोरच्याचं दु:ख दूर पळतं
तिचं हे असलं बोलण ऐकून
माझंही हसू अनावर होतं
आणि तिच्याबरोबर हसताना नकळत
माझंही आयुष्य वाढून जातं

(माझ्या एका मैत्रिणीसाठी लिहिलेली हि कविता)
- रवी विश्वासराव (कवी)
(मी - काव्यसंग्रह)

कोणी सांगेल का?



प्रेम म्हणजे काय असतं
हे कोणी मला सांगेल का?
नयनांतून जन्म घेऊन
शब्दसुरांच्या मार्गाने ते
ओठांतून निघून
हृदयापाशी पोहोचणे
याला प्रेम म्हणतात का?
आपल्याला आवडणाऱ्या
एका व्यक्तीच्या सहवासात
मिळालेले आनंदाचे क्षण
हृदयाला टोचल्यावर
जो जिव्हाळा निर्माण होतो
याला प्रेम म्हणतात का?
दोन व्यक्तींनी एकमेकांना समजणं
एकमेकांच्या भावना जाणून
अंत:करणातून सर्वस्वी
त्यालाच आपलं मानणं
याला प्रेम म्हणतात का?
एकाच्या सुखासाठी दुसर्याने
स्वत:च्या जीवनात दु:ख पेरणं
त्या पेरलेल्या दु:खातही
स्वर्गसुखाचा अनुभव घेणं
याला प्रेम म्हणतात का?

- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

पावसाळी रात्र होती...


तिच्या आठवणींनी
भिजून चिंब झालेली
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती
पावसाच्या थेंबाने
वादळाच्या गार वार्याने
माझ्या देहाला स्पर्श करून
तिच्या सोबतीची साक्ष देणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...
मोकाट सुटलेला वारा
विजेच्या चमकणार्या तारा
छेडत हृदयाच्या धारा
तिचा विरह दूर करण्याचा
प्रयत्न करणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...
तिच्या आठवणींचा
माझ्या हृदयावर सतत
घात चालू असताना
बाहेरच्या नभातली वर्षा
माझ्या नयन नभातून
अश्रूंच्या रूपाने बरसणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...
बाहेर वादळी वारे
वाहत होते
आणि त्याच वेळी
तिच्या विरहाची वेदना
माझ्या नसानसांत
वादळ निर्माण करणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...
त्या पावसाळी रात्री बाहेर
स्मशानशांतता पसरली होती
त्या शांततेच्या रुपात
तिच्या आठवणींना उकरत
माझ्या जीवनात येणार्या
धोक्याची सूचना देणारी
प्रेमातुर अशी ती एक
पावसाळी रात्र होती...

- रवी विश्वासराव (कवी)
(मी माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

Thursday, April 22, 2010

आज मला असं का होतंय?




आज मी असा का वागतोय
स्वत:ला स्वत:पासून दूर का लोटतोय
आज मला असं का होतंय?
सतत तिचेच विचार माझ्या
मनात हेलकावे खात आहेत
तिचा चेहरा तिच्या आठवणी
माझ्या मनाला सतावत आहेत
आज मला असं का होतंय?
ती मला सोडून गेल्यापासून
एकटाच जीवन जगात होतो
मग, आज ती दिसल्यापासून
मी स्वत:ला प्रश्न का विचारतोय?
आज मला असं का होतंय?
पूर्वीसारखं रात्री चांदण्या मोजणं
तिच्या आठवणींनी रडू येणं
तिच्याकडे धावत जाऊन तिला
आपल्या बाहुपाशात घ्यावंसं वाटतंय
आज मला असं का होतंय?
तिच्यासोबत पाहिलेलं
सुंदर स्वप्न कधीच तुटलं होतं
मग ते सुंदर स्वप्न पाहण्यासाठी का
डोळे पुन्हा आतुर होत आहेत
आज मला असं का होतंय?
ज्या शब्दांनी कधी माझी
संगत सोडली होती
तेच शब्द कविता करण्यास का
पुन्हा मला चाळवत आहेत
आज मला असं का होतंय?
वेडं मन चुकार पाखरू होऊन
बेधुंद सैरवैरा धावत सुटतंय
तिच्याच प्रेमाची ओढ का
मनाला पुन्हा लावतंय
आज मला असं का होतंय?

कवी रवी विश्वासराव
(मी माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

Tuesday, April 6, 2010

असावं कुणीतरी आपलसं!


जीवनाच्या वाटेवरती
जीवलावून माझ्यावरती
जीवापाड प्रेम करणारं
असावं कुणीतरी आपलसं!
जिच्यासाठी जगावं
तिच्यासाठी मरावं
असं मला वाटणारं
असावं कुणीतरी आपलसं!
माझ्यावर रुसणारं
माझ्यासमवेत हसणारं
माझ्या चुका सावरणारं
असावं कुणीतरी आपलसं!
आयुष्याच्या वाटेवरती
प्रेमबंधाच्या उंबरठ्यात
माझी आतुरतेने वाट पाहणारं
असावं कुणीतरी आपलसं!
सुख दुःखांची सोबती होऊन
कठीण प्रसंगी धैर्य देऊन
मला योग्य मार्ग दखवणारं
असावं कुणीतरी आपलसं!
संकटांवर मात करुन
आयुष्यभराची साथ देऊन
माझ्यासोबत चालणारं
असावं कुणीतरी आपलसं!
माझा एकटेपणा दूर करुन
माझ्याशी प्रेमाच नातं जोडून
मलासुद्धा आपलं म्हणणारं
असावं कुणीतरी आपलसं!

(मी माझा असा एकटा - काव्यसंग्रह)
-:रवि विश्वासराव (कवि)

Friday, April 2, 2010

प्रेम म्हणजे


प्रेम म्हणजे;
उंच आकाशात चमकणारा तारा की,
हळूवार अंगाला स्पर्श करणारा वारा
प्रेम म्हणजे;
धरतीच्या उरात चालणारा नांगर की,
पडणा-या विजेला स्वःतात सामावून घेणारा सागर
प्रेम म्हणजे;
भर उनात झाडाकडून मिळणारी छाया की,
आईची आपल्या मुलावरील माया
प्रेम म्हणजे;
वणव्याच्या आगीत जळणारं जंगल की,
दुस-याला सुवास देण्यासाठी झिजणारं चंदन
प्रेम म्हणजे;
मनातल्या प्रेमळ भावनांचा खेळ की,
आपुलकिचा आणि विश्वासाचा मेळ

-:रवि विश्वासराव (कवी)
(मीच माझा असा एकटा - कविता संग्रह)

प्रेमांकुर 3


माझ्या दरवाजात यम आला
त्याला मी आत ये म्हटलं
मला न घेताच तो निघून गेला
कारण तुझ्यासाठी माझं प्रेम पाहून
त्याच्याही डोळ्यात पाणी साटलं
-----------------------------
लोकं म्हणतात
ज्याची जळते त्यालाच कळते
याचा अर्थ असा नाही की,
जाळणा-यालासुद्धा जळणा-याची व्यथा कळते
-----------------------------
लोक म्हणतात दगडाच्या मुर्तीत
दैवीशक्तिंचं सत्व असतं
आपल्यावर प्रेम करणा-या व्यक्तीवरचं
प्रेम करावं
हे सुखी आयुष्याचं तत्व असतं
-----------------------------
प्रेमाला शोधत मी
जगभर फिरलो
प्रेम तेव्हा सापडलं मला
जेव्ह तुझ्या गावात शिरलो
-----------------------------
आपल्या प्रेमाची चर्चा
आता गावातही सुरु झालीय
मला वाटतं आपल्या लग्नाची
वेळ जवळ आलीयं
-----------------------------
सारं काही उत्तम असूनही
एखादी मैफल रंगत नाही
आयुष्यभराची तुझी साथ मागतोय
क्षणभराची संगत नाही
-----------------------------
अति अपेक्षा करणं
नातं तुटण्याचं लक्षण आहे
पण ते तुटणारं नातं सावरण्यासाठी
मी अजूनतरी सक्षम आहे
-----------------------------
सुंदरतेची स्तुती तोच करतो
ज्याला सुंदरतेची जाण आहे
सुंदरता पाहूनही स्तुती न करणं
हा सुंदरतेचा अपमान आहे
-----------------------------

-: कवी रवी विश्वासराव
(प्रेमांकुर - चारोळी संग्रह)

प्रेमांकुर 2


असं म्हणतात स्वतः मेल्याशिवाय
आपल्याला स्वर्ग दिसत नाही
तसचं आपण कुणावर प्रेम
केल्याशिवाय प्रेमाचा अर्थही कळत नाही
-----------------------------
तिला एक नजर पहायला
माझं मन आतूर होत
क्षण भर पाहताच तिला
मन माझ्याशीच फितूर होतं
-----------------------------
मैट्रीचं नात हे कधी
जोडलेलं असतं तर कधी आपण जोडतो
मित्राच्या सुखासाठी माणुस
स्वतःच्या सुखावर पाणी सोडतो
-----------------------------
जीवनातील प्रत्येक नातं
अनेक रंगानी रंगलेलं असतं
सुख दुःखांच्या सावलीने
घर सदैव भरलेलं असतं
-----------------------------
प्रेमात आपल्याला काहीच
गवसलं नाही असं वाटतं
जुन्या आठवणी दटून आल्यावर
मात्र डोळ्यात पाणी साठतं
-----------------------------
प्रेम आपल्याला नकळतपणे
फार काही शिकवून जातं
प्रेमाच्या वाटेवर गेल्यावर मात्र
डोळ्यात फक्त पाणी शिल्लक राहतं

-: कवी रवी विश्वासराव
(प्रेमांकुर - चारोळी संग्रह)

प्रेमांकुर 1


चारोळ्यांच किती चांगलं असतं
प्रत्येकाच्या मनासारखं वागतात
मनातल्या प्रत्येक भावना
मोजक्या शब्दात सांगून टाकतात!
-----------------------------
चारोळ्यांच्या जगात वावरताना
मला काहिच आठवत नाही
सर्व आठवणी शब्दात मांडतो
कारण मनात मी काहिच साठवत नाही
-----------------------------
चारोळ्या आपल्या जीवनात
फार महत्वाची भूमिका बजावतात
एकूण एक शब्दतून आपल्याला
जुन्या आठवणीत पाठवतात
-----------------------------
चारोळ्यांच्या जगात वावरायला
प्रत्येकाला आवडत असतं
दुःखाच्या क्षणी आपल्याला ते
सुखाच्या गावात पाठवत असतं
-----------------------------
समुद्रकिनारी तिच्यासोबत
मी वाळूचं घर बांधलं होतं
नजर चुकवून पाण्याच्या लाटेसोबत
ते घर कधीच वाहून गेलं होतं
-----------------------------

तुझ्या घराची खिडकी
मला पाहून नेहमी हसते
तिच्या हसण्यात सुद्धा मला
तुझ्या गालावरचीच खळी दिसते
-----------------------------

तुझ्या घराच्या वाटेवरील
प्रत्येक गोष्टीसोबत माझी मैत्री झाली आहे
कारण तु सोबत नसताना
त्यानींच मला खरी साथ दिली आहे
-----------------------------

तुझ्या घराच्या खिडकिकडे पाहतो
तेव्हा पडदा असतो लावलेला
माझ्या तेव्हाच्या वेदना पाहण्यासाठी
गावही तिथे असतो जमलेला
-----------------------------

-: कवी रवी विश्वासराव
(प्रेमांकुर - चारोळी संग्रह)

प्रेमांकुर


ऐन तारुण्यात

आयुष्याच्या उंबरठ्यात

हळूवार भावनांची

साद कोणी घालत असतं......

डोळ्यांच्या साक्षीने

विश्वासाच्या सोबतीने

ऋदयात पवित्र नात्याचा

"प्रेमांकुर" जन्म घेत असतं.......

-:रवि विश्वासराव (कवी)
(प्रेमांकुर - चारोळी संग्रह)

वाट चालते सासरची...


मी लेक माझ्या बापाची
सोडून माहेर वाट चालते सासरची
आईच्या मायेची
बापाच्या छायेची
ओढ मनी माझ्या
माहेरच्या अंगणाची
सोडून हे सारे बंध
जोडू कशी नवीन नाती सासरची
बापाचे बोट धरून चालली
आईच्या पदराखाली वाढली
आठवणी या उरी घेउनी
आज मी लेक बापाची
सोडून माहेर सासरी चालली
सरू लागले क्षण वेगाने
घटिका जवळ येऊ लागली
पडता अक्षता तुटतील बंध
उरतील फक्त आठवणी
मी लेक माझ्या बापाची
सोडून माहेर वाट चालते सासरची

(स्वप्नांच्या वाटेवरती - कविता संग्रह)
-: रवी विश्वासराव (कवी)

Thursday, April 1, 2010

जाणता राजा


.... जय भवानी .... !!!
.... जय शिवाजी .... !!!

प्रिय मित्रहो,
सस्नेह जय महाराष्ट्र

ज्यांनी मराठी साम्राज्यासाठी, हिंदू संरक्षणासाठी, आणि स्वराज्यासाठी स्वताचे सर्व आयुष्य पणाला लावलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज ई. स. १६३० फेब्रुवारी १९, शिवनेरी किल्ला, पुणे येथे राजमाता जिजाबाई यांच्या पोटी जन्म झाला........... ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी 5 पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी।

हे दुर्दैव म्हणव लागेल कि, सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यापासून, दिल्लीच्या तख्तापर्यंत ज्याच्या घोड्याच्या टापा गेल्या त्या शिवबाचे वारस आपण पण आज किती जनांना महाराजांचा इतिहास माहित आहे............ अगदी कमी...........

ज्यांनी अख्ख आयुष्य या मातीसाठी बहाल केल, वयाच्या अगदी १६ व्या वर्षापासून ५० पर्यंत फक्त स्वराज्य आणि स्वराज्य हाच विचार केला............
२२ हजारांची फौज घेवून आलेला अफझल खान, ३२ हजार फौझ घेवून आलेला सिद्धी जोहर, ६० हजारच्या आसपास फौज घेवून उतरलेला शाहिस्तेखान, या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. या सगळ्यावर मात केली....... एक हिंदू राजा पण औरंग्याचा चाकर मिर्झा राजा १ लाख फौज घेवून उतरला, पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य देखील केला............ राजे आग्र्यामध्ये कैद असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला, बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ??? महाराजांकडून..............



हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला...........
कडेकपारीत उगवलेलं रानफूल, पुष्पराज गुलाबाप्रमाणे सौंदर्यसंपन्न,सुगंधी नसतं,पण म्हणून ते कधी गुलाबाची बरोबरी करू शकणार नाही असं मुळीच नाही, किंबहुना ते रानफुल या गुलबापेक्षाही श्रेष्ठ असतं जेव्हा ते माझ्या राजाच्या एखाद्या गडकोटावर उगवलेलं असतं.

महाराजाविषयी थोडेशे.............
अधिकारकाळ- जून ६, १६७४ - एप्रिल ३, १६८०

राज्याभिषेक- जून ६, १६७४

राज्यव्याप्ती- पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंतआणिउत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत

राजधानी- रायगड

पूर्ण नाव- शिवाजीराजे शहाजीराजे भोसले

पदव्या- गोब्राह्मणप्रतिपालक

जन्म- फेब्रुवारी १९, १६३० शिवनेरी किल्ला, पुणे

मृत्यू- एप्रिल ३, १६८० रायगड

उत्तराधिकारी- छत्रपती संभाजीराजे भोसले

वडील- शहाजीराजे भोसले

आई- जिजाबाई

पत्नी- सईबाई,सोयराबाई,पुतळाबाई,काशीबाई,सकवारबाई

संतती- छत्रपती संभाजीराजे भोसले, छत्रपती राजारामराजे भोसले

राजघराणे- भोसले

राजब्रीदवाक्य-
'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'

चलन- होन, शिवराई (सुवर्ण होन, रुप्य होन??)

१ - जन्मदिनांकाच्या निश्चितीबद्दल मतमतांतरे आहेत.

शिवकल्याण राजा।।
निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।

नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।

यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।

आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।

धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।सावधपणे नृपवर तुच्छ केले।।

देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।

हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केलीया भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।

महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।कित्येक दृष्ट संहारली।

कित्येकासी धाक सुटला ।कित्येकाला आश्रयो जाहला

।शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते आणि अश्या नाट्यमय घटनांमुळे खरे कर्तुत्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो. महाराजांच्या जीवनात अश्या घटना ५-६ पेक्षा अधिक नाहीत. पहिली अद्भुत घटना १६५९ मध्ये अफझलखानवध ही आहे. तर शेवटची १६६६ ला आग्र्याहून सुटका ही आहे. ह्या ७ वर्षात पन्हाळा - बाजीप्रभु, शाहिस्तेखान प्रकरण, सूरतलूट ह्या घटना आहेत. म्हणजे एकुण ५० वर्षाच्या जीवनात पाहिल्या नाट्यमय घटनेपूर्वी २९ वर्षांचा नाट्यशून्य काळ आणि शेवटच्या नाट्यमय घटनेनंतर १४ वर्षांचा कालखंड...!!! ह्या अश्या ५-६ घटनांवर आपल्या कर्त्या पुरुषाचे चरित्र कसे पूर्ण होइल ??? छत्रपतींचे कार्य आणि चरित्र समजुन घेताना ह्या नाट्यमय रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिले.

शिवरायांच्या नेत्रुत्वाचा विचार जेंव्हा जेंव्हा पडतो तेंव्हा २ प्रश्न समोर येतात ...

१. खुद्द औरंगजेब आपली राजधानी सोडून दक्षिणेत का उतरला ???

२. १६९२ नंतर आपण ही लढाई पूर्णपणे जिंकू शकत नाही, हे माहीत असुनही पुढची १५ वर्षे लढत का राहिला ???

त्याच्यासारख्या कसलेल्या युद्धनितीतज्ञ आणि मुत्सद्दी अश्या बादशहाला महाराष्ट्रातल्या पश्चिमेकडील एका कोपऱ्यातल्या डोंगराळ भागात वसलेले छोटेसे राज्य बूडवण्यात अपयश का आले ??? औरंगजेबाने केलेल्या तयारीवरुन हे स्पष्ट दिसते की त्याने ही लढाई साधी - सोपी नक्कीच समजली नव्हती. लाखोच्या फौजा जातीने घेउन उतरणे यावरुनच ते स्पष्ट समजते. लाखोने मुघल फौजा सीमेवर उभ्या असताना अवघ्या ५० व्या वर्षी छत्रपतींना मृत्यू आला. पण तरीही राजधानी पासून दूर राहून, दरवर्षाला कोट्यावधी खर्च करून आणि उत्तर भारतात अव्यवस्था निर्माण होउन देखील औरंगजेब अखेरपर्यंत लढत राहिला. त्याने अनेक लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता. मराठ्यांना अपुऱ्या साधन-सामुग्रीवर मोघलांचा पराभव करणे शक्य नव्हते. तरीही सर्व प्रतिकूल परिस्थितिमध्ये मराठे लढत राहिले. छत्रपति संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षे आणि त्यांच्या वधानंतर १९ वर्षे जनता लढत राहिली.

पृथ्वीराज चौहान, राणा प्रताप, रामराजा ह्यांनी सुद्धा परकियांविरुद्ध प्रखर लढा दिला. पण जिकडे जनता लढते तिकडे फौजा निकामी होतात. भारताच्या इतिहासात १२०० वर्षांनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी जनता अखंड २७ वर्षे लढली. हयात धर्माभिमान नव्हे तर आपण लढू शकतो हा आत्मविश्वास जास्त महत्वाचा आहे. छापे घालण्याचे नवे तंत्र निर्माण करणे, विरतेच्या खोट्या कल्पनेच्या आहारी जाउन 'लढून मरणे' यापेक्षा - टिकणे, गरज असल्यास पळणे, मग पळवणे, थकवणे आणि अखेर नाश करणे हे जास्त महत्वाचे. यासोबत प्रजेच्या इहलौकिक गरजा सांभाळणे आलेच. यानंतर धर्माभिमान महत्वाचा. एखादे राज्य टिकवण्यासाठी जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा, ही घटनाच हिंदुस्तानच्या इतिहासात सर्वात जास्त रोमांचक आहे... नवखी आहे...

शिवछत्रपतींच्या कार्यपद्धतीचा विचार अधिक तपशीलवारपणे समजुन घेणे महत्वाचे आहे. 'शिवाजी म्हणजे युद्ध नव्हे, तर नव्या व्यवस्थेचा आग्रह ... त्या व्यवस्थेच्या रक्षणासाठी युद्ध हे साधन.' सन १६४५ ते १६४९ ही ४ वर्षे बारा मावळची व्यवस्था लावण्याचे काम अखंड सुरू होते. वतनदारांचा बंदोबस्त करणे आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करणे ही सर्वात महत्वाची कामे ह्या काळात केली गेली. सामान्य असणाऱ्या मोरोपंत पिंगळे, तानाजी मालुसरे आणि प्रतापराव गुजर अश्या व्यक्तिंमधून असामान्य कर्तुत्ववान प्रधान, सेनापति, सुभेदार निर्माण करणे हा महाराजांचा आणखी एक पैलू.

शिवरायांचे व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याचे वैशिष्ट्य ह्यात आहे की, जेंव्हा त्यांना माघार घ्यावी लागली, अपयश आले किंवा ताब्यातला प्रदेश होरपळून निघाला; तरीसुद्धा लोकांचा त्यांच्यावरील विश्वास तसूभरही कमी झाला नाही. एखादा चुकार माणूस वगळता त्यांच्या फौजेने कधी बंद पुकारले नाही. १६४९ मध्ये सुद्धा सर्वच अनिश्चित असताना लोक त्यांच्या बाजूने उभे राहिले असे लोकांना त्यांनी दिले तरी काय होते ??? त्यांचे वैशिष्ट्य यात आहे की, ते जेंव्हा-जेंव्हा जिंकत तेंव्हा-तेंव्हा नवा प्रदेश पूर्णपणे ताब्यात घेत आणि जेंव्हा पड़ती घेत तेंव्हा नव्याने जिंकलेल्या प्रदेशाचा काही भाग सोडून देत असत. म्हणजेच पुढच्या वेळी लढण्याची शक्ती त्यांनी सुरक्षित ठेवलेली असते. जन्मभर त्यांनी ह्याच पद्धतीने कारभार पाहिला. त्यांचे चौरस नियोजन आणि युद्ध आखणीला राज्य विस्तारात रूपांतरित करण्याचे श्रेय अप्रतिम आहे.

भारतीय राजांमध्ये ते एक असे एकमेव निराळे राजे आहेत, ज्यांनी सदैव संभाव्य परीणामांचा विचार केला. युद्धाच्या योजना आखताना भूगोलाचा विचार केला. त्यासाठी त्यांनी कोकणपट्टी आणि वरघाटचे नकाशे बनवून घेतले होते. त्यांचे 'हेरखाते आणि भौगोलिक नियोजन' हा त्यांच्या युद्ध नेतृत्वाचा महत्वाचा पैलू आहे. १६४८ मध्ये फत्तेखानाला पराभूत केल्यानंतरही सिंहगड आदिलशाहीला परत करणे ह्या मागे कुशल नियोजन आहे. १६४८ मध्ये शहाजी राजांची सुटका झाल्यावर छोट्याश्या स्वराज्याला खानस्वारी पेलवणार नाही हे त्यांना लगेच उमगले होते. जावळी जिंकल्याशिवाय 'अफझलखान' या प्रश्नाला उत्तर नाही हे त्यांना १६४९-५० लाच उमगले होते. ती संधी राजांना १६५६ ला मिळाली. जावळी मागोमाग त्यांनी पुन्हा सिंहगड काबीज केला आणि आदिलशाहीला उघडउघड आव्हान दिले. १६५९ च्या खानस्वारीपर्यंत जो वेळ राजांना जावळीत मिळाला, त्यावेळात जावळीच्या दुर्गम खोऱ्यात प्रत्येक माणूस - 'हे राज्य टिकले पाहिजे' या त्वेषाने पेटून उठला असला पाहिजे.

खानवधात एक प्रश्न नेहमी विचारला जातो ते म्हणजे दगा कोणी दिला ??? राजांनी की खानाने ??? समजा खान सुरक्षित परतला असता तर पुढच्या भेटीत शिष्टाचार म्हणुन राजांना खानभेटीस त्याच्या गोटात जाणे भाग पडले असते. प्रतापगडाच्या पायथ्याशी आलेला ... नव्हे आणलेला खान परत जिवंत जाणे शक्य नव्हते. ती व्यवस्था शिवरायांनी करून ठेवली होती. खानवधापाठोपाठ त्याच्या फौजेवर बांदल - शिळीमकर यांनी हल्ला चढवणे, वाई तळावर नेताजी पालकरने विध्वंस करणे, मोरोपंतांनी पारघाटावर हल्ला करणे आणि पूर्ण ताकदीनिशी शक्य तितक्या लवकर कोल्हापुर प्रांती धडक मारणे एवढा व्यापक दृष्टिकोन आणि नेमके नियोजन ह्यामागे आहे. अनापेक्षित घाव घालून जग थक्क करता येते पण त्या थक्क अवस्थेतून बाहेर येईस्तोवर शिवराय काही स्थिर कामे करत असतात. ते विजयोस्तव साजरे करत बसत नाहीत. खानवधा पाठोपाठ कोल्हापुर - पन्हाळा जिंकणे, कुडाळ मारून विजापुर प्रांती धडक मारणे आणि पुढच्या १८ दिवसात १२०००च्या फौजेचा पराभव करून लूट मारणे व ती फौजा दुप्पट करण्यात वापरणे, आणि ह्या सर्वातून आदिलशाही सावरेपर्यंत जास्तीत जास्त प्रदेश जिंकणे, हे सैनिकी कौशल्य ... !!!



"स्थायी यश मिळणाऱ्या मोहिमेचा आरंभ म्हणुन अनपेक्षित धक्याला अर्थ असतो पण तो धक्का देऊन थक्क करणे आणि भानावर येण्यापूर्वी स्थिर विजय मिळवणे हा राजकीय वास्तववाद म्हणजे छत्रपति शिवराय ... "

शाहिस्ते खान प्रकरण असो नाहीतर सूरत लूट, शत्रूला प्रत्येक ठिकाणी नवनवीन पद्धतीने थक्क करून त्यांनी आपले कौशल्य पणाला लावले आहे.

२२ हजाराची फौज घेउन आलेला खान, त्यामागोमाग ३२००० फौज घेउन आलेला सिद्दी जोहर, ६०००० च्या आसपास फौज घेउन उतरलेला शाहिस्तेखान ह्या सगळ्यात मराठी राज्य चिरडले गेले होते. पुढे मिर्झाराजा सुद्धा लाखभर फौज घेउन दख्खनेत उतरला. एवढे प्रचंड ओझे राज्यावर असताना , १ तप यातना भोगून, जाळपोळ, नासधूस, नुकसान सहन करूनही जनतेची निष्ठा तसूभर देखील कमी का झाली नाही ??? या लोकांना राजांनी असे काय दिले होते ??? बाजीप्रभु असो नाहीतर शिवा काशिद ... तानाजी असो नाहीतर मुरारबाजी ... ह्या सर्वात एक विलक्षण साम्य आहे. माणसे लढताना मरतात ही लढाई मधली नित्याची बाब आहे. पण जाणीवपूर्वक आपण मरणार याची खात्री असताना, केवळ मरण्यासाठीच लढतात ही अभुपुर्व गोष्ट आहे. ह्या माणसांना मरण्याची प्रेरणा कुठून मिळते ???

अनेक साहसी लढाया आणि पराक्रम ह्याचा अंत पुरंदरच्या तहात झाला. १६ वर्षे खपून जे मिळवले ते एका क्षणात तहात गेले. या तहावरुन समजुन आले की ज्यांच्याविरुद्ध राजे लढत होते ते किती बलाढ्य होते. पुरंदरच्या तहात पूर्ण पराभव होता आणि आपली पुढची लढण्याची किमान शक्ती शाबूत ठेवून राजांनी हा तह पूर्णपणे मान्य देखील केला. या पराभवाचा परिणाम नेताजी पालकर वर झाला आणि त्याने स्वराज्याची साथ सोडली. १६५९ ते १६६५ या काळात जे कणखरपणे लढले ते प्रचंड कसोटयांमधून बाहेर पडले. राजे आग्र्यामध्ये असताना देखील त्यांनी कारभार चोख ठेवला. राजा अटकेत असताना देखील फौजा बंड करत नाहीत आणि जनतेचा विश्वास कमी होत नाही हे महत्वाचे आहे.

आग्र्याहून सुटून आल्यावर शिवरायांनी स्वतः औरंगजेबाला पत्र लिहून तह मोडणार नसल्याचे कळवले होते. १६६७ ते १६६९ ह्या वर्षात उठावाची जोरदार तयारी केली गेली पण गेलेला एकही किल्ला घेण्याचा पर्यंत केला गेला नाही. मात्र १६७० च्या सुरुवातीपासून अवघ्या ५ महिन्यात सर्व किल्ले मराठ्यान्नी जिंकून घेतले. हे अजून एक थक्क काम. १६७१-७१ ह्या काळात तर खानदेश - बागलाण - बुरहाणपुर - जालना - व्हराड ह्या सर्व मोघल भागात छापे घालून लूट मिळवणे आणि अस्थिरता निर्माण करणे हे काम जोमाने सुरू होते. या सर्व घडामोडीसोबत १६५७ पासून आरमाराची उभारणी करून समुद्रावर छापे घालण्याचे तंत्र विकसित करणे, व्यापारी नौका उभारणे, नविन किल्ले उभारणे आणि हाती आलेले किल्ले दुरुस्त करणे असे चौरस उपक्रम सुरू होतेच.

हिंदूंचा नवा अध्याय शिवरायांपासून सुरू होतो. हिंदू राजांनी विश्वास ठेवावा आणि परकियांनी दगे द्यावेत हा इतिहास बदलून शिवरायांनी दगे द्यावेत आणि शत्रूला थक्क करावे हा नविन इतिहास सुरू झाला. राजे धार्मिक होते पण धर्मभोळे नव्हते. साहसी होते पण आततायी नव्हते. त्यांची राहणी वैभव संपन्न होती पण उधळी नव्हती. राज्याचे सिंहासन ३२ मणाचे बनवणारा राजा सूती वस्त्रात, लाकडी पलंगावर झोपत असे. चित्र, शिल्प आणि संगीत ह्यांना आश्रय देणे यासाठी ना त्यांच्याकड़े वेळ होता ना पैसा. त्यांना मोठ्या मोठ्या ईमारती बांधण्याची फुरसत देखील नव्हती. दुष्काळात लाखो लोक अन्न-अन्न करीत मरत असताना २० कोट रुपये खर्चुन ताजमहाल बांधण्यात त्यांना रस नव्हता किंवा त्यांच्या मनाचा तो कल देखील नव्हता. अकबराने हिंदूंना औदार्याने वागवले, तर राजांनी मुसलमानांना औदार्याने वागवले. त्यांच्याकडून आक्रमणाची भिती होती तरीही. हिंदूंकडून अशी भीती कधीच नव्हती. राजांनी सर्वांना समान वागवले ते भोवतालच्या मुस्लिम राज्यांच्या भीतीने नव्हे तर स्वयंभू औदार्य म्हणुन.

ते कुशल सेनानी होते, युद्धतज्ञ होते. या खेरीज ते मुलकी कारभाराचे तज्ञ होते. प्रजेच्या ईहलौकिक कल्याणाची जबाबदारी आपली आहे, हे त्यांना पुरेपुर माहीत होते. प्रजेवर निरर्थक कर त्यांनी कधी लादले नाहीत. (सिंहासनपट्टी हा जादा कर सुद्धा त्यांनी वतनदारांवर लावला.) 'मी शत्रूंना दगा दिला, पण मित्रांना दगा दिल्याचे एक तरी उदहारण दाखवा' असे जाहिर आव्हान त्यांनी दिले होते. त्या आव्हानाला आजतागायत उत्तर आलेले नाही. कौल देऊन गावे बसवणे, बीघे-चावर जमीन मोजणे, जमीन लागवडीखाली आणणे, बी-बियाणे - नांगर-बैल यासाठी कर्ज देणे, शेतसारा निश्चित करणे असे विधायक उपक्रमही त्यांनी केले. त्यांच्या काळात उत्पन्नाच्या ४० टक्के कर होता. आजही हा कर लहान नाही. तरी सुद्धा लोकांनी २/५ ही वाटणी आनंदाने स्विकारली. कारण कर दिल्यावर पक्षपात न होता संपूर्ण संरक्षण आणि न्याय याचे आश्वासन मिळायचे. 'पक्षपातरहित निर्दोष अंमलबजावणी' हे त्यांच्या राजवटीचे एक गमक आहे. कारण त्यांनी हक्क वतनदारांकडे न ठेवता स्वतःकडे घेतले.

भाषा सुधारण्यासाठी 'राज्यव्यवहार कोश', पंचांग सुधारण्यासाठी 'करण-कौस्तुभ', धर्मात शुद्ध करून घेणे हे सुद्धा त्यांनी केले. स्त्रीची अब्रू निर्धोक केली. त्यासाठी स्वतःचा निष्ठावान सरदार सखोजी गायकवाड ह्याचे हातपाय तोडण्यास कमी केले नाही. फौजेला शिस्त लवली. गावातून काही फुकट घेऊ नये असा दंडक केला. आपल्या फौजेतल्या ३०० लोकांकडून एका गावाला उपसर्ग झाल्याचे कळताच त्यांचे हात तोडले. कारण बळकटपणे तलवारी हातात घेणारे हात ह्यापेक्षा शासनामागे उभा राहणारा जनतेचा हात त्यांना जास्त महत्वाचा होता. 'मुलकी सत्ता ही लश्करी सत्तेपेक्षा श्रेष्ठ असली पाहिजे' हे सांगणारा आणि त्यावर वाटचाल करणारा असा माणूस भारताच्या इतिहासात एकमेव आहे. म्हणुनच तर समर्थ त्यांना 'शिवकल्याण राजा' म्हणतात.

स्त्रियांचे व गुलामांचे आठवडी विक्री बाजार त्यांनी बंद करवले. तर विरोधकांच्या धर्मग्रंथांचा व पूजास्थानांचा त्यांनी सदैव आदर केला. अतिशय संयमी आदर्श गृहस्थजीवन ते जगले. निर्दोष व सुखी राज्यकारभार केला. स्वतः शुन्यातून राज्य निर्मिती करून हे 'श्रींचे राज्य' आहे अशीच त्यांची वागणूक राहिली. म्हणुन तर ते श्रीमंत योगी झाले.

त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास म्हणजे आपला आत्मविश्वास जागा करणाऱ्या एका युगप्रवर्तक नेत्याचा अभ्यास असतो.

.... वंदे शिवराय .... !!!

***** तुमच्या सारखाच एक शिवभक्त *****
***** रवी विश्वासराव (कवी) *****

Wednesday, March 31, 2010

तुझ्याविना!


तुझ्याविना!
स्वप्न आता डोळ्यात माझ्या
कधीच ते दिसणार नाही
ह्रदयातली जागा माझ्या
कधीच आता भरणार नाही
तुझ्याविना!
सोबतीत तुझ्या आनंदाला
पारावार माझ्या उरत नाही
विरहात मी तर एक क्षणही
आता जगणार नाही
तुझ्याविना!
तुझ्या समवेत सुंदरसे
मी एक स्वप्न पाहिले
स्वप्न ते माझे संसाराचे
वास्तवात उतरणार नाही
तुझ्याविना!
प्रेमात मी तुझ्यावरी भाळलो
प्रेमात तुझ्या मी एकटाच झुरलो
सोडून जाता तू मला
मीच माझा एकटा उरलो
तुझ्याविना!
प्रेमाचे ते सुंदर फुल
उमलते ह्रदयातूनी
ते फूल माझ्या ह्रदयातूनी
कधीच आता उमलणार नाही
तुझ्याविना!
धावून तुझ्या आठवणींपाठी
कविता मी रचली तुझ्याचसाठी
शब्दही माझे मुके पडले
काव्यालाही अर्थ उरलाच नाही
तुझ्याविना!
जेव्हा माझी घटका भरेल
अंतिम क्षणी एक इच्छा उरेल
त्या क्षणी तू भेटण्यास ये
अन्यथा मरण मजला येणार नाही
तुझ्याविना!
प्रेमात मजवर घात झाला
विरहाचा क्षण पदरी आला
पुन्हा विचार असला करणार नाही
मन कधीच कुठे वळणार नाही
तुझ्याविना!

(मीच माझा असा एकटा - कविता संग्रह)
-: कवि रवि विश्वासराव.

रात्र


रात्र अशीच जाते
तिच्या आठवणीने
चांदण्या मोजण्यात
आकाशात बघत
तिची वाट पाहण्यात
रात्री झोप लागत नाही
रात्र दिवसासारखी वागत नाही
घड्याळाच्या काट्यासोबत
वेळ नुसती पळत असते
माझ्यासोबत विनाकारण
रात्रसुद्धा तळमळत असते
जागं असेपर्यंत तिचे विचार
मनात घुटमळत असतात
बेधुंद मनाची पावलं
सैरावैरा पळत सुटतात
अचानक झोपेची चाहूल लागल्यावर
रात्री डोळे बंद झाल्यावर
नेहमीचाच सुरु होतो खेळ
कळत नाही कसा जातो वेळ
मग तिचा चेहरा येतो स्वप्नात
आणि स्वप्नातल्या तिच्या
हस-या ओठांना पाहून
मनातले विचार तिच्या
पाऊलखुणांचा मागोवा घेत
तिच्यामागे पळत सुटतात
आणि काळाचे भान न राहता
संपूर्ण रात्र जाते
इकडून तिकडे कुशी बदलण्यात
अखेर पहाटे शांत झोपेत
वेळेची घंटा झोपमोड करते
आणि अशा परिस्थितीत
रात्र अशीच निघून जाते!

-:रवि विश्वासराव (कवि)

प्रेमा तुला काय म्हणू?


वीणेच्या तारेतून निघणारा
संगीताचा मधुर सुर
की दोन जीवांच्या मनाला
लागणारी हुरहुर
प्रेमा तुला काय म्हणू?
लोकाच्या मनातला
तो दुर्मिळ तिरस्कार
की प्रेमविराच्या मनात
उगम झालेला अविष्कार
प्रेमा तुला काय म्हणू?
नशिबाने भेटलेलं
ईश्वरी शक्तीचं वरदान
की समाजाच्या मनातली
अश्लीलतेची घाण
प्रेमा तुला काय म्हणू?
मानवी जीवनातील
एक अद्भूत किमया
की आईची मुलावरील
एक वेडी माया
प्रेमा तुला काय म्हणू?
अमावस्येला चांदण्यांकडून
मिळणारा मंद प्रकाश
की जे अथांग आहे
असे ते निराकार अवकाश
प्रेमा तुला काय म्हणू?

(मीच माझा असा एकटा - कविता संग्रह)
-:रवि विश्वासराव (कवि)

नाते प्रेमाचे


या जगात नाही दुसरे
प्रेमाहुन निर्मळ नाते…
पण हेच नाते क्षणात आपुले
जिवन विस्कटून जाते
या नात्याला व्याख्या नाही
थोर सांगून गेले बरे
मात्र ते फार सुंदर असते!
हे विधान आहे खरे.
केव्हातरी मी हि केले होते,
जिवापाड प्रेम एकीवर…….
पण, माझ्या प्रेमाला तिचा
नकार आहे आजवर.
मला दु:ख नाही तिच्या
नकारार्थी उत्तराचे..
दु:ख वाटते ते तिच्या
प्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि
निव्वळ टाईमपास या शब्दांचे….
तिला नाही कळला,
माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ…
तिच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण,
ते सारे गेले व्यर्थ.
मी तिच्यावर आजही
मनापासून प्रेम करतो,
मनातले प्रेमभाव,
कवितेच्या रुपात वाहतो.
कळेल तिला माझ्या
एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा!
फार वेळ झाली असेल…
कारण, मी असेन देवाघरी तेव्हा!

(मीच माझा असा एकटा - कविता संग्रह)
-: रवि विश्वासराव (कवि)

कसं विसरशील?


तुझ्या माझ्या प्रेमाला
आपल्यातील अतूट
प्रेमाच्या नात्याला
कसं विसरशील?
तासनतास आपलं
फोनवरुन गप्पागोष्टी करणं
विषय न सुचल्यावर
आपल्या तोंडातल्या तोंडात
आवंढा गिळणं
कसं विसरशील?
आपण घेतलेल्या शपथा
एकमेकांना दिलेली वचनं
सा-या जगाला लपवून
आपणं गुपचूप प्रेम करणं
कसं विसरशील?
रोजचा बसायचा आपला
बागेतला बाकडा
कॉलेज मधला कट्टा
तिथे आपलं रोजचं भेटणं
भेटल्यावर नुसतं एकमेकांना पाहणं
कसं विसरशील?
माझं उशिरा येणं
तुझं त्यावर रागावणं
गुलाबाचं फूल देऊन
मग तुझी समजूत काढणं
कसं विसरशील?
मैत्रीणींच्या घोळक्यात
मी दिसता थोडक्यात
तुझं माझ्याविषयी गोष्टी करणं
त्यावर मैत्रीणींनी तुझी चेष्टा करणं
कसं विसरशील?
तुझ्यासाठी जगाशी
मी भांडण करणं
पाहून ते सारं, तुझ्या
डोळ्यांतून पाणी वाहणं
कसं विसरशील?
आपल्या प्रेमातील
अनमोल आठवणी
कधी सहवासाचे तर
कधी विरहाचे क्षण
कसं विसरशील?
तू म्हणालीस “मला विसर”
पण तुला विसरणं
माझ्यासाठी तरी कठीण आहे
पण तू तुझ्या
पहिल्या प्रेमाला
कसं विसरशील?

(मीच माझा असा एकटा - कविता संग्रह)
-:रवि विश्वासराव (कवि)

आठवतात ते दिवस!


तिला एक नजर पहायला
तिच्याशी दोन शब्द बोलायला
तिच्या एका भेटीसाठी तरसणारे
आठवतात ते दिवस!
तिच्या घराजवळच्या वळणावर
तिच्या खिडकीकडे पाहत
ती आत्ता येईल या आशेने
तासनतास तिची वाट पाहत
उम्मेदिने भरलेले माझे डोळे
आठवतात ते दिवस!
संध्याकाळी तिंच फिरायला जाणं
फिरुन तिच पुन्हा घरी येणं
मधल्या त्या वेळेत
माझ्या मनाचं तळमळणं
त्या तळमळण्यातसुद्धा
गोडी निर्माण करणारे
आठवतात ते दिवस!
तिचा होकार मिळवण्यासाठी
मनाला वाट्टेल ते करणं
मैत्रीणींना तिच्या मस्का मारणं
मैत्रीणींना लाडीगोडी करुन
तिचा होकार मिळवून देणारे
आठवतात ते दिवस!
आज तिचंही माझ्यावर प्रेम आहे
पण तिच्या घरातल्यांमुळे
ती माझ्यापासून दूर आहे
तिच्या विरहाच्या दुःखात
जुन्या आठवणींचं मलम लावणारे
आठवतात ते दिवस!

(मीच माझा असा एकटा - कविता संग्रह)
-:रवि विश्वासराव (कवि)

माझचं चुकलं!


तुझ्या सोबतीचं
जे स्वप्न मी पाहिलं
ते तू नव्हतं दाखवलं
तरी ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी
मी एकटाच पळत राहिलो
माझचं चुकलं!
आई वडिलांच्या माझ्याविषयी
इच्छा-आकांक्षा, त्यांची स्वप्न
पायाखाली चिरडून
तुला मिळवण्यासाठी
अतोनात प्रयत्न करत राहिलो
माझचं चुकलं!
तू मला भेटणार नाही
हे मला ठाऊक असूनही मी
वेड्यासारखा
तुझं प्रेम मिळवण्यासाठी
वाट्टेल ते करत सुटलो
माझचं चुकलं!
फक्त तुझ्याच सुखासाठी
स्वतःला दुःख देत राहिलो
तुला हसत ठेवण्यासाठी
आयुष्यभराचं रडणं घेऊन बसलो
माझचं चुकलं!
तुझ्यासाठी स्वतःला
कवडीमोल करुन
तुझ्या मनात माझ्यासाठी
विश्वास आणि थोडी जागा
नाही मिळवू शकलो
माझचं चुकलं!
माझ्याविषयी तुझ्या मनात
प्रेम निर्माण करायला
माझी जिद्द केव्हा कमी पडली
आणि माझा आत्मविश्वास
केव्हा आणि कसा ढासळला
हेच मला कळलं नाही
माझचं चुकलं!
या दुनियेच्या विशाल अंधकारात
तुला सुखांचा शालू नेसवायला
रवि किरणांच्या शोधात
एकटाच फिरत राहिलो
माझचं चुकलं!
माझचं चुकलं!

(मीच माझा असा एकटा - कविता संग्रह)
-:रवि विश्वासराव (कवि)

घर तुझं माझं!


स्वप्न ज्याचे पाहिले मी
वास्तवात ते उतरावं
प्रतिक तुझ्यानि माझ्या प्रेमाचं
एक सुंदरासं असावं
घर तुझं माझं!
डोंगराच्या पायथ्यावरती
नदिच्या त्या काठावरती
फुल झाडांच्या मधोमधी
निसर्गकुशीत ते बाधांवं
घर तुझं माझं!
भिंतींनी इंद्रधनूच्या रंगात न्हाऊन
छत देण्या आभाळानेही यावे धाऊन
चंद्रचांदण्यांनी प्रकाश देऊन
स्वर्ग स्वप्न तेथे साकारावं
घर तुझं माझं!
तिथे असावा प्रेम जिव्हाळा
सुखांचाही तेथे लागावा मेळा
छोट्या पाखरांनी होऊन गोळा
प्रेम फुलांनी ते सजवावं
घर तुझं माझं!
सुखांच्या पावसाने
प्रेमाच्या सावलीने
स्वप्नांच्या संगतीने
तुझ्या माझ्या विश्वासाने
असावं भरलेलं
घर तुझं माझं!
सुखात आपण नांदू त्यात
संसार आपला सजेल ज्यात
आपल्यातल्या अनमोल नात्याने
प्रेमाच ते प्रतिक बनावं
घर तुझं माझं!

-:रवि विश्वासराव (कवि)
(मीच माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

मीच माझा असा एकटा!


जीवनाच्या वाटेवरती
कुणीच नाही माझा साथी
मीच माझा असा एकटा!
आयुष्याच्या वाटेवरती
भेटली मज अनेक नाती
सुखात माझ्या सारे सोबती
दुःखात मात्र विसरुन जाती
मीच माझा असा एकटा!
जगती या अंधाराच्या
सावली दिसते संकटाची
देण्यास धैर्य प्रसंगी या
भेटले मज कुणीच नाही
मीच माझा असा एकटा!
एकी समवेत स्वप्न पाहिले
तिच्या चरणी सर्वस्व वाहिले
तिनेच मजला सावरले
पाहूनी सारे जगही बावरले, तरिहि
मीच माझा असा एकटा!
नशीबाने मजसंग घात केला
स्वप्नांनाही तो तोडून गेला
प्रेमास माझ्या द्रुष्ट लावूनी
मजपासून तिला हिरावून गेला, म्हणूनी
मीच माझा असा एकटा!
जीवनावर माझ्या बसला पहारा
आता नाहि मजला कुणीच सहारा
एकटेच जगणे एकटेच मरणे
जीवनाट एवढेच भोग उरले
मीच माझा असा एकटा!
-:रवि विश्वासराव (कवी)
(मीच माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

प्रेमस्पर्श 5

मित्र जसा आहे तसं स्विकारणं
हा मैत्रीचा पहिला नियम असतो
जो कोणी हा नियम विसरतो तो
एकटेपणाचं दुःख आयुष्यभर सोसतो
—————————–
मैत्रीच्या नात्याच्या व्याख्या मात्र
दर क्षणाला बनत असतात
पण ख-या मैत्रीची पाळंमुळं
आयुष्यभर मनात रुतून बसतात
—————————–
मैत्री हा शब्द जीवनात
फारच महत्वाचा आहे
एकतरी खरा मित्र मिळवणं
हा प्रश्न प्रत्येकाच्या सत्वाचा आहे
—————————–
एखाद्याच्या भावनांची कदर करणे
म्हणजे ती मैत्री नसते
प्रेमाच्या ओलाव्याची, विश्वासाच्या
गाठींची ती बांधिलकी असते
—————————–
माझा एकटेपणा हीच
माझी कैफियत आहे
कारण माझ्या नशिबाची
माझ्या मनासोबत तफावत आहे
—————————–
माझ्या आयुष्यात अनेक
कठीण प्रसंग सामोरी येतात
माझ्याशी दुःखांची सांगड पाहून
आल्या पाऊली ते परत जातात
—————————–
किर्रर्र अंधारात क्वचितच
सावली दिसते प्रकाशाची
प्रेमाचा आधार भेटणं
ही गोष्ट असते नशिबाची
—————————–
तुला माझी आठवण येणं
हा माझ्या नशिबाचा भाग आहे
याचा अर्थ असा की तुझ्या मनात
माझं प्रेम अजूनही जागं आहे
—————————–
नशिबाने माझ्यासोबत
विश्वासघात केला
माझ्या हातावर प्रेमाची रेषा
मांडायलाच तो विसरुन गेला
—————————–
माझ नशिब नेहमी
माझ्या विरोधात वागत आलयं
माझ्या सुखालाचमाझ्या कडून
नेहमी भिक्षेत मागत आलयं
—————————–
-:रवि विश्वासराव (कवी)
(प्रेमस्पर्श-चारोळी संग्रह)

प्रेमस्पर्श 4

विवाह रुपाने बांधली जाईल
तुझी नि माझी जीवनगाठ

कारण आहे आपल्या दोघांची

एकच पाऊलवाट

———————————

काहीजण किती

कठोर नियम पाळतात

प्रेम करणाऱ्यांना नेहमी

बदनामीच्या आगीत जाळतात

———————————

काहीजण कळूनसुद्धा

नकळल्यासारखे वागतात

प्रेम करणाऱ्यांवरती ते

सदैव बंधने लादतात

———————————

प्रेम करण्यासाठी हवी तयारी

संकटांना तोंड देण्याची

प्रेमाने मागून मिळत नसेल तर

जबरदस्तीने ओढून घेण्याची

———————————-

लोकांच अजब आहे

प्रेमाला ते नाव ठेवतात

लग्न जुळवताना मग ते

गाव का शोधतात?

———————————

-: रवि विश्वासराव (कवी)
(प्रेमस्पर्श-चारोळी संग्रह)

प्रेमस्पर्श 3

माझ्या हृदयात फक्त

तुझ्यासाठीच जागा आहे

आपल्याला नात्यात बांधणारा

प्रेमाचा एकच धागा आहे

———————————

प्रेमाला कोणतीही उपमा

अतिशयोक्तीच ठरेल

तुझ्या माझ्यातल्या विश्वासानेच

मात्र प्रेमाचा घडा भरेल

———————————

प्रेम या अडिच अक्षरात

ब्रम्हांडाएवढं सुख असतं लपलेलं

दोन जीवांनी त्यात सृष्टीतलं

नाजुक बंधन असतं जपलेलं

———————————

प्रेमाची व्याख्या करायला

सर्वांनाच जमत नाही

ज्याला जमत नाही

त्याला प्रेम कधीच उमजत नाही

——————————–

विरोधकांना नेहमी

प्रेमाचा विसर पडलेला असतो

कारण त्यांच्या बरोबर कधी

तसा प्रसंगच घडलेला नसतो

——————————–

-: रवि विश्वासराव (कवी)
(प्रेमस्पर्श-चारोळी संग्रह)

प्रेमस्पर्श 2

प्रेमात हवयं मन
तुझ्या भेटीसाठी तरसणारं
पावसाच्या ढगांसारखं
उन्हाळ्यातही बरसणारं
—————————–
प्रेमाच्या मार्गावर मी
पाहतोय तुझी वाट
जगासमोर स्वीकार करु प्रेमाचा
ठेवून मान आपली ताठ
—————————–
लोकं असं म्हणतात की,
जसं करावं तसं भरावं
पण हा कुठला नियम की,
सदैव प्रेम करणा-यांनीच मरावं
—————————–
अमावस्येच्या रात्री सर्वांना
चांदण्या प्रकाश देत असतात
याचा अर्थ असा नाही की,
त्या चंद्राची जागा घेत असतात
—————————–
एकदा माझ्या अंगणत
पाऊस घनघोर बरसत होता
खरतर आपल्यातला दुरावा पाहून
तो अश्रुंच्या धारा सांडत होता
—————————–
लोकांना सवय असते
दुस-याच्या कामात नाक खुपसायची
दुस-यांची गुपितं उघड्यावर आणून
स्वतःची मात्र लपवायची
—————————–
-:रवि विश्वासराव (कवी)
(प्रेमस्पर्श-चारोळी संग्रह)

प्रेमस्पर्श 1

तुझ्या विरहाने मी
सतत तळमळत असतो
तू आता येशील या विचाराने
तुझी वाट पाहत बसतो
—————————–
चार ओळींतून प्रेम व्यक्त करणं
प्रत्यकाला जमत नाही
ज्याला जमत नाही
त्याला प्रेम कधीचं उमजत नाही
—————————–
प्रेम केल्याने होत नसतं
नकळत होऊन जातं
ज्याच्यावर आपण प्रेम करतो
त्याच्या सुखासाठी नेहमी झटत राहतं
—————————–
प्रेमाच्या मार्गावर मला
अनेक संकटे भेटली
पण तुझ्या विरहाने तर
माझ्या स्वप्नांचीच पाऊलं छाटली
—————————–

तुझ्या प्रेमात मला
एक अनोखी शक्ती जाणवते
तुझ्यावर प्रेम करायला मला
तुझी हरएक अदा खुणावते
—————————–
-:रवि विश्वासराव (कवी)
(प्रेमस्पर्श-चारोळी संग्रह)

प्रेमस्पर्श

चारोळ्यांच आयुष्य फक्त

चार ओळींतच असतं दडलेलं

त्यातून तेच व्यक्त होतं

जे प्रत्यक्षात असतं घडलेलं

चार ओळींतून व्यक्त करताना

मनाच्या भावना कंठ माझा दाटतो

म्हणूनच चारोळ्यांच्या रुपाने

हा “प्रेमस्पर्श” मी सर्वांना वाटतो

(प्रेमस्पर्श-चारोळी संग्रह)
-:रवि विश्वासराव (कवी)

तारुण्याचा उंबरठा


ह्रदयाला एक हूरहूर लागते
कुणाच्या तरी प्रेमळ स्पर्शाची
इच्छा प्रत्येक मनी जागते
ऐन तरुण्याच्या उंबरठ्यात
वय वर्ष सोळा-सतरा
तरुणाईचा सर्वात मोठा खतरा
ह्रदयातूनी प्रेमाची भावना
हळूवार जन्म घेत असते
ऐन तरुण्याच्या उंबरठ्यात
कुणाच्या तरी प्रेमाची
ओढ मनाला लावतं
दिवसाढवळ्या स्वप्नात रमतं
रात्री चांदण्या मोजत जागतं
गावभर शोधत प्रेमाला
मन ह् वेडं पिसाट धावतं
ऐन तरुण्याच्या उंबरठ्यात
एक पाऊल चुकतं
एक पाऊल सावरतं
प्रत्येक जीवनाला
विलक्षण कलाटणी देतं
ऐन तरुण्याच्या उंबरठ्यात
थोडसं रुसतं, थोडं रागावतं
तहान भूक विसरुन जातं
सूख-चैन गमावून बसतं
कुणाची तरी वाट पाहतं
ह्रदयाला असं काय होतं
ऐन तरुण्याच्या उंबरठ्यात
प्रत्येकाच्या आयुष्यात
असा क्षण येत असतो
प्रेमाच्या रुपाची खरी
ओळख करुन देत असतो
ऐन तरुण्याच्या उंबरठ्यात
कुणाच्या तरी स्वप्नात
हरवायचं असतं
या क्षणाला आनंदाने
जगायचं असतं
ऐन तरुण्याच्या उंबरठ्यात
(मीच माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)
-: रवि विश्वासराव (कवी)

मला कोणी सांगेल का?


प्रेम म्हणजे काय असतं
हे मला कोणी सांगेल का?
नयनांतून जन्म घेऊन
शब्दसूरांच्या मार्गाने ते
ओठांतून निघून
ह्रदयापाशी पोहोचणे
याला प्रेम म्हणतात का?
आपल्याला आवडणा-या
एका व्यक्तीच्या सहवासात
मिळालेले आनंदाचे क्षण
ह्रदयाला टोचल्यावर
जो जिव्हाळा निर्माण होतो
याला प्रेम म्हणतात का?
दोन व्यक्तिंनी एकमेकंना समजणं
एकमेकांच्या भावना जाणून
अंतःकरणातून सर्वस्वी
त्यालाच आपलं मानणं
याला प्रेम म्हणतात का?
एकाच्या सुखासाठी दुस-याने
स्वतःच्या जीवनात दुःख पेरणं
त्या पेरलेल्या दुःखातही
स्वर्गसुखाचा अनुभव घेणं
याला प्रेम म्हणतात का?

(मीच माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)
-:रवि विश्वासराव (कवि)

Tuesday, March 30, 2010

मी कवी नाही!



माझ्या रचना, माझे शब्द
वाचून मला काहीजण म्हणाले
मित्रा तू झालास कवी
पण........
पण.... मी कवी नाही!
कारण माझ्या रचना, माझे शब्द
म्हणजे कवीचे काव्य नाही
माझे शव्द, रचना म्हणजे
माझ्या भावना आहेत
माझ्या ह्रदयाच्या व्यथा आहेत
एकतर्फी प्रेमाच्या कथा आहेत
याच एकतर्फी प्रेमात
मनात जन्मलेल्या भावनांना
काव्याचं स्वरुप देऊन
शब्दसूरांच्या मार्गाने
मी कागदावर उतरवले
माझ्या या रचना म्हणजे
तिच्या आठवणीचे
पुरावे आहेत
तिच्यासाठी वेचलेले
माझ्या प्रेममय आयुष्यातील
अनमोल आनंदाचे क्षण आहेत
याला मी काव्य कसे म्हणू?
म्हणूनच मी कवी नाही!
कवी लिहितो,
मनातले विचार कागदावर मांडतो
पण मी............
कागदावर उतरवतो
माझा प्रेमावरचा अतूट विश्वास
कधीही पूर्ण न होणारं माझं स्वप्न
माझ्या रचना म्हणजे
माझं जीवन आहे, कारण
माझे शब्द्, माझ्या रचना
माझ्या श्वासात सामावल्या आहेत
याला मी काव्य कसे म्हणू?
म्हणूनच मी कवी नाही!
-:रवि विश्वासराव (कवी)
(मीच माझा असा एकटा! - काव्यसंग्रह)

व्यथा ह्रदयाची

काय सांगू मी तूजला
व्यथा माझ्या वेड्या ह्रदयाची
लागते वेडी आस फार
तुझ्या सोबत क्षणांची
तुझ्या मुखातून जणू
झरा शब्दांचा वाहतो
पायाखाली चालताना
सडा फुलांचा सांडतो
तुझ्या स्पर्शातच जणू
बाण विजेचा लागतो
तुझ्या केसातच जणू
चंद्र आधार मागतो
तुझा विरहग भारी
सये सोसवेना मला
तुझ्या आठवणी घुसवी
माझ्या काळजात भाला
तुझा विरहग सखे
माझे काळीज फाडतो
विरहाचा प्रत्येक क्षण
अश्रू माझ्या डोळ्यात सांडतो
सोबतीत तुझ्या क्षणात
पुरे आयुष्य मी जगतो
विरहाच्या एका क्षणात
पुन्हा पुन्हा मी मरतो
माझ्या काव्यातून सखे
मी तुझे रुप साकारतो
जणू तुझ्या रुपाची प्रतिमा
माझ्या ह्रदयात उभारतो
सांगून व्य्था ही ह्रदयाची
प्रेम व्यक्त मी करतो
सखे नीट विचार कर पुन्हा
काळ हा असाच सरतो....
काळ हा असाच सरतो.....

(मीच माझा असा एकटा!-काव्यसंग्रह)
रवि विश्वासराव (कवी)